आ. विनय कोरे यांचा माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या हस्ते सत्कार
schedule29 Nov 24 person by visibility 69 categoryPolitics

कुंभोज प्रतिनिधी ; विनोद शिंगे
वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांनी शाहूवाडी - पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची "आमदार पदी" निवड झाल्याबद्दल सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील,वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.