आवळीतील धरणाची दुरुस्ती करणेची ग्रामस्थांची मागणी...
schedule23 May 25 person by visibility 467 categoryकोल्हापूर

देवाळे - आवळी ता पन्हाळा येथील आवळी - शिंदेवाडी रसत्यावरील कदम वस्ती जवळ हे धरण असून या धरणाचा संपूर्ण गावाला फायदा होत असून सध्या या धरणाची अवस्था बिकट झाली असून या धरणाची पावसाळ्या पूर्वी दुरुस्ती करणेची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायती वेळोवेळी करून सुद्धा ग्रामपचायती दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थां तून नाराजी व्यक्त होत आहे तरी पावसाळ्यात ओढ्याला पाणी येण्या अगोदर धरणाची दुरुस्ती करणेची मागणी ग्रामस्थां तून होत आहे .
प्रतिक्रिया - मी वेळोवेळी ग्रामपंचायती ला धरणाची दुरुस्ती करणे साठी लेखी अर्ज दिला आहे तसेच पदाधिकारी याना भेटून मागणी केली असता त्यानी दुर्लक्ष केले आहे .
माणिक वसंत पाटील ( आवळी ) ग्रामस्थ