एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज येथे संविधान दिनी विविध कार्यक्रम
schedule26 Nov 24 person by visibility 47 categoryEducation
कुंभोज प्रतिनिधी ; विनोद शिंगे
एम. जी. शहा विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज, बाहुबली येथे ७५ वा संविधान दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते. सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संविधान ग्रंथ पूजन करण्यात आले. त्यानंतर क्रीडाविभाग प्रमुख शरद जुगळे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
उपस्थितांचे स्वागत अध्यापक तात्यासो आवटी यांनी केले व प्रास्ताविकामध्ये त्यांनी संविधान दिनाचा उद्देश व त्याचे महत्त्व काय आहे ते सांगितले. विद्यार्थी मनोगतामध्ये वृषाली खोंद्रे हिने संविधानाबद्दल माहिती सांगितले.
अध्यापिका मनोगतामध्ये जिनमती नांदणे यांनी संविधान म्हणजे काय, तसेच राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज, सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती विश्वास, श्रद्धा यांचे महत्त्व सांगितले.
अध्यक्ष मनोगतामध्ये प्रशालाचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुंदर विचार व त्यांनी केलेले कष्ट,त्यांनी तीन वर्षाच्या आतमध्ये संविधान कसे पूर्ण करून दाखविले हे उदाहरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितले. जगातील सर्वात मोठा ग्रंथ म्हणून "भारतीय संविधान" आहे हे त्यांनी सांगितले.
त्यानंतर संविधान ग्रंथ दिंडी काढण्यात आली यामध्ये इयत्ता नववीचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागीं झालेले होते.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे,पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई,तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यावसायिक विभाग प्रमुख अरुण चौगुले हे उपस्थित होते.
आभार प्रदीप धोत्रे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्मिता निटवे यांनी केले.