माजी विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयाचा नावलौकिक - डॉ. निवेदिता माने
schedule30 Oct 24 person by visibility 74 categoryEducation
रुकडी- रुकडी सारख्या ग्रामीण भागात लोकनेते बाळासाहेब माने यांनी उच्च शिक्षणाची सोय केली, त्यामुळे रुकडी व पंचक्रोशीतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण पूर्ण करता आले. विशेषतः बारावी उत्तीर्ण नंतर मुलींचे शिक्षण थांबायचे परंतु या महाविद्यालयामुळे उच्च शिक्षण घेता आले,
त्यामुळे या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यासाठी आपण आपल्या संसारातून वेळ काढून उपस्थित आहात, महाविद्यालयासी असलेले ऋणानुबंध असेच राहू द्या. या महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेवून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. असे मत बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. निवेदिता माने यांनी व्यक्त्त केले. त्या येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थी समन्वय समिती प्रमुख डॉ. अशोक पाटील यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांतकुमार कांबळे म्हणाले सन २०२४-२०२५ या वर्षापासून आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र महाविद्यालयास मंजूर झाले असून आजी विद्यार्थ्यां बरोबर माजी विद्यार्थ्यांनाही विविध कौशल्य कोर्सेस करता येतील त्यामुळे नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसाय करुन विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनता येईल. यावेळी माजी विद्यार्थी फौंडेशनचे अध्यक्ष श्री. राजू माळी, सचिव श्री. राजकुमार थोरवत, माजी विद्यार्थी श्री. पुष्पक पाटील, श्री. विनोद कदम, श्री. प्रशांत गुरव, श्री. सचिन चौगुले, सौ. प्रज्ञा जाधव या माजी विद्यार्थ्यांनी तर शिक्षकांच्या वतीने प्रा. डॉ. उत्तम पाटील, डॉ. विजय देसाई यांनी मनोगत व्यक्त्त केले. या मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी फौंडेशनचे श्री. कुमार चव्हाण, श्री. प्रविण पाटील, श्री. कृष्ण यादव, ॲड. राजीव शिंगे, सौ. रुपाली पाटील, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार श्री. अमर बुल्ले यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. शर्मिला साबळे यांनी केले