Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
धनश्री जोशी यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...रेखा काटे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संकेत सोनवणे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न... पल्लवी गायकवाड यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर जयंत पाटलांचा टोला... 10वी-12वी बोर्ड रिझल्टबद्दल ताजे अपडेट्स काय...?भरतशेठचा अजित दादांना मुख्यमंत्री होण्याच्या विधानावर चिमटा... पशुसंवर्धन विभागाच्या विविध लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करा - जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर

जाहिरात

 

सेन्सेक्सकडून शेअर बाजाराला उभारी

schedule22 Nov 24 person by visibility 163 categoryBusiness

मुंबई : अदानी-अमेरिका वादामुळे गेल्या दोन दिवसांपासून भारतीय बाजारात भीतीचे वातावरण होते. अदानी समूहातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शुक्रवारी बाजाराने सर्व मळभ दूर करत तेजीची भरारी घेतली. अदानी समूहातील जवळपास सर्वच शेअर्सने मोठा पल्ला गाठला, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी दिलासा अनुभवला.


BSE सेन्सेक्सने शुक्रवारी तब्बल 1034.76 अंकांची झेप घेत 78,190.55 अंकांवर पोहोचला. NSE निफ्टीनेही 329.15 अंकांची वाढ नोंदवून 23,679.05 अंकांवर व्यापार केला. या शानदार प्रदर्शनामुळे BSEच्या एकूण बाजार भांडवलात 5 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.


बँकिंग, आर्थिक, आयटी, आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सनी बाजाराला उभारी दिली. ICICI Bank, State Bank of India, Reliance Industries, Infosys, Tata Consultancy Services, L&T, Bharati Airtel यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत बाजाराचा तोल सावरला.

अदानी समूहातील जवळपास सर्व शेअर्सने शुक्रवारी चांगली कामगिरी केली. या समूहातील गुंतवणूकदारांच्या मनातील भीती दूर झाली असून, समूहाने पुन्हा विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
संपूर्ण बाजारात उत्साहाचे वातावरण असून, गुंतवणूकदारांनी दिलासा अनुभवला आहे. तेजीच्या या लाटेमुळे भारतीय बाजाराने पुन्हा आत्मविश्वास मिळवला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes