हास्य-विनोदाचा कल्ला करणारा श्री गणेशा
schedule19 Nov 24 person by visibility 169 categoryEntertainment

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषयांवर आधारित सिनेमे पाहायला मिळतात, पण रोड मूव्ही प्रकारातील सिनेमांची संख्या मात्र कमी आहे. त्यामुळेच अशा प्रकारचा सिनेमा येण्याच्या घोषणा झाल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. याच कारणामुळे “श्री गणेशा” हा नातेसंबंधांवरील धम्माल गंमती-जंमतीवर आधारित मराठी फॅमिली एन्टरटेनर सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने चर्चेत आहे.
“श्री गणेशा” सिनेमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांनी टिझरला लाइक्स आणि कमेंट्स देऊन त्यांच्या आनंदाचे इजहार केले आहे. हास्य आणि विनोदाने सजलेला हा सिनेमा प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी तयार आहे. हा सिनेमा 20 डिसेंबर 2024 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे, आणि सिनेमाच्या टिझरच्या मिळालेल्या प्रतिसादावरून, तो खूपच मनोरंजनात्मक आणि हसवणारा ठरणार, असे दिसते.