Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
धनश्री जोशी यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...रेखा काटे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संकेत सोनवणे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न... पल्लवी गायकवाड यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर जयंत पाटलांचा टोला... 10वी-12वी बोर्ड रिझल्टबद्दल ताजे अपडेट्स काय...?भरतशेठचा अजित दादांना मुख्यमंत्री होण्याच्या विधानावर चिमटा... पशुसंवर्धन विभागाच्या विविध लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करा - जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर

जाहिरात

 

मिनी इंडियामध्ये पंतप्रधानांनी जागवल्या खास आठवणी; 1998 रोजीच्या दौर्‍याची का होतेय चर्चा.. 

schedule11 Mar 25 person by visibility 98 categoryकोल्हापूरTravel

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून मॉरीशस दौर्‍यावर आहेत. भारत आणि मॉरीशस या दोन देशात ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक संबंध आहेत. मॉरीशस आणि भारताचे खास आणि जुने संबंध आहेत. पंतप्रधानांनी 1998 मध्ये पहिल्यांदा मॉरीशसचा दौरा केला होता. या खास दौऱ्याची छायाचित्र समाज माध्यमांवर पुन्हा प्रकटली आहे. मोदी आर्काईव्हच्या माध्यमातून एक पोस्ट पण समोर आली आहे. एक शतकापूर्वी आपले पूर्वज, मजूर म्हणून मॉरीशसमध्ये आले होते. ते आपल्यासोबत तुलसीदास यांचे रामायण, हनुमान चालीसा आणि हिंदी भाषा घेऊन गेले होते, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यात अजून एक 27 वर्ष जुना अध्याय जोडला गेला आहे.

पंतप्रधान मोदी हे मॉरीशस दौऱ्यावर पहिल्यांदा गेले होते तेव्हा, ते कोणत्याही सार्वजनिक पदावर नव्हते. ते तेव्हा फक्त 
 भाजपासाठी कार्यरत होते. 2 ते 8 ऑक्टोबर 1998 दरम्यान मोदी हे जागतिक रामायण संमेलनासाठी मॉरीशस येथे गेले होते. त्यावेळी ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी तिथे प्रभू श्रीरामांचा आदर्श, मूल्य आणि जीवनकार्यावर प्रकाश टाकला होता. 
1998 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या लोकांची मनं जिंकली. त्यांनी स्थानिक नेते, लोकं यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या इच्छा, आकांक्षा समजून घेतल्या. त्यांनी त्यावेळी मित्र जमवले. तेव्हाचे राष्ट्रपती कासम उतीम, पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम आणि विरोधी पक्षनेते अनिरुद्ध जगन्नाथ यांच्यासह अनेक मुख्य नेत्यांशी त्यांची पक्की मैत्री झाली. नंतरचे पंतप्रधान पॉल रेमेंड बेरेन्झर यांच्याशी सुद्धा त्यांची भेट झाली होती.

महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या त्रिसूत्रीवर हे दैनिक प्रकाशित होत असल्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. त्यामुळे मॉरिशसमध्ये सर्व भाषीय समूह, गट यांच्यामध्ये एकजिनसीपण आल्याचे मोदी म्हणाले.

आपल्या पहिल्या दौर्‍यात 17 वर्षांपूर्वी मोदी यांनी 12 मार्च 2015 रोजी गंगा तलाव येथे गंगा मातेला अर्घ्य अर्पण केले. 2015 मध्ये मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त त्यांनी या राष्ट्राला संबोधित केले. आंब्याचे उत्पादन चांगले झाले की नाही पाहण्यासाठी अडीतील सर्वच आंबे तपासण्याची गरज नाही. त्यातील दोन-चार आंबे चाखून पाहिले तरी कळते, तसेच मॉरिशस पाहिल्यानंतर भारताची झलक दिसते असे ते म्हणाले. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes