आता शहरातील रस्ते मोकळे
schedule13 Dec 24 person by visibility 51 categoryTravel
कोल्हापूर: शहरातील रस्त्यालगत अनाधिकृतरीत्या व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने आज कोल्हापूर महापालिका आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.
लक्ष्मीपुरी आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील रस्त्यालगत अनधिकृतपणे लावलेल्या हातगाड्या, स्टॉल्स, आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांवर ही मोहीम केंद्रित होती. या मोहिमेमुळे वाहतुकीला होणारा अडथळा दूर होऊन, शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
अनेक तक्रारींनंतर, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज सकाळी लक्ष्मीपुरी परिसरातून मोहीम सुरू केली. येथे रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या गाड्या, स्टॉल्स, आणि विविध वस्तू विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. त्यानंतर मध्यवर्ती बस स्थानकाजवळील फेरीवाल्यांचे स्टॉल्सही हटवण्यात आले.