Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
विष्णू शिंदे यांच्या 'दावण' कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार...पत्रकाराच्या प्रश्नावर वैष्णवीच्या सासऱ्याची धक्कादायक प्रतिक्रिया... वैष्णवी हगवणे प्रकरणावर काय म्हणाले प्रवीण तरडेपरिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूरचे वैशिष्ट दाखविणारा रॅपसाँग ‘कोल्हापूरी तडका... शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात संभाजी भिडे यांची मोठी मागणी... संजय राऊतांचा धुळे येथील कॅशकांड प्रकरणात कुणावर गंभीर आरोप...  वैष्णवी हगवणे प्रकरणात रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया... प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट... आवळीतील धरणाची दुरुस्ती करणेची ग्रामस्थांची मागणी...

जाहिरात

 

 वाल्मिक कराडची मोठी मागणी; 'या' आजारासाठी हवा मदतनीस

schedule03 Jan 25 person by visibility 135 categoryकोल्हापूरPolitics

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि नंतर खून करण्यात आला. यासह खंडणीप्रकरणात वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण आला होता. त्याला केज न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता कोठडीत असताना वाल्मिक कराड याने मोठी मागणी केली आहे. त्याने न्यायालयाकडे या आजारात 24 तास मदतनीस मिळावा यासाठी दाद मागितली आहे. 

वाल्मिक कराड याने न्यायालयात धाव घेतली. स्लीप ॲप्निया या नावाचा आजार असल्याचा दावा कराड याने केला आहे. ऑक्सिजन मशीन त्यासाठी दररोज लावण्याची गरज आहे. या आजारात ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावण्यात येते. ते चालवण्यासाठी एक मदतनीस 24 तास आवश्यक असल्याने, हा असिस्टंट आपल्याला देण्यात यावा अशी विनंती त्याने केली आहे. त्याने केज न्यायालयाकडे ही विनंती केली होती. सुनावणीशेवटी न्यायालयाने शासकीय वैद्यकीय सुविधा पुरवण्याविषयी सुचवल्याची माहिती समोर येत आहे.

 बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांच्या आमदारांच्या आवाजाला धार आली. ही क्रूर हत्या वाल्मिक कराड याच्या इशाऱ्यावरूनच करण्यात आल्याचा ठपका त्यांनी ठेवला. या प्रकरणी सुरुवातीला चालढकल करणाऱ्या पोलिसांवर मोठा दबाव आला. त्यानंतर वाल्मिक कराड 20 ते 22 दिवसांनी समोर आला. पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात तो दाखल झाला. त्याला अटक करून केज न्यायालयासमोर उशीरा रात्री दाखल करण्यात आले. मंगळवारी 31 डिसेंबर रोजी हा घटनाक्रम झाला. त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes