लग्नसराईत सोन खरेदीसाठी सुवर्णसंधी
schedule13 Nov 24 person by visibility 72 categoryBusiness
मुंबई : भारतात सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्नसराईच्या काळात बहुतेक लोक सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात. आजच्या घटलेल्या दरांमुळे ग्राहकांसाठी ही दागिने खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. दरवर्षी लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरांमध्ये वाढ होत असते, मात्र सध्या झालेल्या या घटेमुळे ग्राहकांना दागिने कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत.
गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी या घसरणीचा फायदा घेत, दागिने खरेदी करणे किंवा सोन्यात गुंतवणूक करणे विचारात घ्यावे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात.सोन्याच्या दरात झालेली ही घट ग्राहकांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात दागिने खरेदी करण्यासाठी योग्य वेळ असल्याचे दिसून येत आहे.
सोन्याचे दर?
22 कॅरेट- 70,450 रुपये
24 कॅरेट- 76,850 रुपये
18 कॅरेट- 57,640 रुपये