कोल्हापुरातील चोरीच्या मोटारसायकलींचे सुटे भाग विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
schedule06 Dec 24 person by visibility 42 categoryPolice Diary
कोल्हापुर: कोल्हापुरातील शिवाजीनगर पोलिसांनी चोरी केलेल्या मोटारसायकलींचे सुटे भाग करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सागर आप्पासाहेब चव्हाण (वय ३२, रा. गोसावी गल्ली) – मुख्य सूत्रधार, स्वप्नील भगवान मुदगल (वय ३८, रा. गोसावी गल्ली) अवधूत यशवंत परीट (वय २७, रा. केळकाळे गल्ली) अशी आरोपींची नवे आहेत.
शहर व परिसरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला होता. चोरी केलेल्या मोटारसायकली एका गॅरेजमध्ये पूर्ण खोलून त्यांचे सुटे भाग विक्री केल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान शोधमोहीम हाती घेतली.
पोलिसांनी स्वप्नील मुदगल याच्या गॅरेजमध्ये छापा टाकला, जिथे तो आणि सागर चव्हाण हे मोटारसायकलींचे भाग काढत असल्याचे आढळले. तपासादरम्यान, शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतील ३ आणि कुरुंदवाड पोलिस ठाण्यातील १ अशा एकूण ४ वाहन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली मिळाली.
जप्त मुद्देमाल
- ४ चोरीच्या मोटारसायकली
- सुटे भाग
- एकूण किमती: ₹१,१७,०००
पोलिसांनी या टोळीत सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. चोरीच्या मोटारसायकली खरेदी करणारे आणि सुटे भाग विकणाऱ्या दुकानांवरील चौकशीही सुरू आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शरद वायदंडे, पोलिस उपनिरीक्षक रमेश मोरे, आणि त्यांच्या पथकातील रावसाहेब कसेकर, सुनील बाईत, गजानन बरगाले, विजय माळवदे, अविनाश भोसले, अरविंद माने, सतीश कुंभार, आणि पवन गुरव यांनी केली.
शिवाजीनगर पोलिसांच्या तत्पर कारवाईने मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होऊन शहरातील अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसणार आहे.