पेठवडगावात घरफोड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
schedule09 Dec 24 person by visibility 43 categoryPolice Diary
पेठवडगाव : पेठवडगाव येथे चोरट्यांनी दोन घरे फोडून सुमारे २० लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी (ता. ८) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सचिन दत्तात्रय कदम आणि बाबासाहेब पाटील यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पहिली घटना वडगाव-कोल्हापूर रस्त्यावरील गणेश मंदिरासमोरील सचिन कदम यांच्या बंद बंगल्यात घडली. कदम कुटुंब नातेवाइकांच्या विवाह सोहळ्यासाठी शुक्रवारी (ता. ६) दुपारी घराला कुलूप लावून पुण्याला गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी बंगल्याच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील तिजोरीचा लॉक तोडून २० तोळे सोन्याचे दागिने आणि २ लाख रुपये रोख रक्कम लंपास केली.
दुसऱ्या घटनेत बाबासाहेब पाटील यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि दागिने व रोख रक्कम चोरली. दोन्ही प्रकरणांतील एकूण चोरीचा ऐवज सुमारे २० लाख रुपयांचा आहे. घटनास्थळी वडगाव पोलीस दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. चोरीच्या या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.