शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
schedule06 Jan 25 person by visibility 108 categoryPolitics
ठाण्यातीलच श्रीनगर भागात राहणार एका 24 वर्षीय तरुणाने जिवे मारण्याची धमकी दिली आहे.शिवसेना नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील पोस्ट त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर केली आहे. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाणे गाठले. अखेर पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा तरुणाचे नाव हितेश प्रभाकर धेंडे. तो ठाण्यातील श्रीनगर वारली पाडा या भागात राहतो. त्याने एकनाथ शिंदे यांना जीव मारण्याची धमकी देणारी पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली. त्यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यासंदर्भात बोलताना ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी म्हणाले, धेंडे याने एकनाथ शिंदे साहेबांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिविगाळ करणारी पोस्ट टाकली. रात्री त्यांच्या घरावर गोळीबार करणार अशी पोस्ट त्याने इंस्टग्रामवर केली होती.
शिवसैनिक श्रीनगर पोलीस स्थानकाबाहेर हितेश धेंडे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी फिर्याद दिली आहे. त्यावरुन त्याच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत.
यासंदर्भात बोलताना शिवसेना पदाधिकारींना सांगितले की, एकनाथ शिंदे साहेबांना धमकी देणारी पोस्ट त्या तरुणाने का केली, कशासाठी केली त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांना धमकी देण्यापर्यंत त्याची मजल कशी गेली? यासंदर्भात शोध घेतला पाहिजे. धमकी देणारा तरुण विकृत प्रवृत्तीचा आहे, असेही सांगितले जात आहे.