अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग आणि एकच खळबळ
schedule15 Nov 24 person by visibility 65 categoryTravel
मुंबई: मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील मेट्रो स्टेशनवर आज अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. बीकेसी मेट्रो स्टेशनमधील अंडरग्राऊंड मेट्रो परिसरात ही आग लागली आहे. या घटनेमुळे तातडीने प्रशासनाने मेट्रोची सेवा पूर्णपणे थांबवली असून, प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही सध्या या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही, परंतु अधिकृत माहितीची प्रतिक्षा केली जात आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत बीकेसी मेट्रो स्टेशन परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे.