संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना मदत करणारेही सहआरोपी
schedule04 Jan 25 person by visibility 52 categoryPolitics
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याप्रकरणी मारेकऱ्यांना तातडीने अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. परभणीच्या नूतन महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात आमदार सुरेश धसही सहभागी होणार आहेत. आता नुकतंच त्यांनी परभणीत सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकाच्या मृत्यूबद्दल भाष्य करत “मी परभणीला मोर्चात जात आहे. संतोष देशमुख याचा खून झाला आहे. तर सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांचे निधन झालं आहे. या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी उहापोह होईल, जे घडले त्याच्यावर मार्ग का काढायचा, यावर चर्चा करु. याप्रकरणी अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजेच 75 ते 80 टक्के मार्ग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काढला आहे. पण परभणीमध्ये नेमकं कुणाचं काय चुकलं, याचं थोडंसं विश्लेषण होण्याची आवश्यकता आहे. एक अधिकारी सस्पेंड झाला आहे. आणखी कुणाची काही जबाबदारी असेल तर ते तिथे गेल्यानंतर कळेल. तिथल्या संघटनांनी बोलवले त्याच्यामुळे मी चाललोय”, असे सुरेश धस म्हणाले.