संजय राऊतांचे मोठे वक्तव्य; म्हणाले “पडद्यामागे…”
schedule04 Jan 25 person by visibility 38 categoryPolitics
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. आता या हत्येप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यातील दोघांना पकडल्याचा दावा करण्यात येत आहे. याप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सुरेश धस यांनाही टोला लगावला आहे.
नुकतंच संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. तसेच त्यांना सुरेश धस यांनी याप्रकरणी केलेल्या आरोपांवरही विचारणा करण्यात आली. यावेळी बोल्ट असताना संजय राऊत म्हणाले कि “हे प्रकरण पोलिसांच्या तपासामध्ये आहे. न्यायप्रविष्ठ आहे. ज्यावेळी आम्हाला वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालत नाही, त्यावेळी हे प्रश्न आम्हाला विचारा. पोलिसांच्या कार्यवाहीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. पोलिसांच्या कार्यवाहीवर बाधा येईल असे काही करू नये. हे प्रकरण योग्य दिशेला न्यायचं असेल तर तपास सुरू राहिला पाहिजे”
“सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. त्यांना बीडमधील हे राजकारण मोडीत काढायचा आहे. भूमिका मांडणे, राजकारण करणं यापेक्षा तपासाच्या संदर्भात प्रश्न निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे. मोर्चाला जाणार तिथे जाऊन पत्रकार परिषद घेणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडचे संतोष देशमुख यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबिय दु:खात आहेत. त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. त्याशिवाय ते बोलणार नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना बीडमधला दहशतवाद मोडून काढायचा आहे. त्यांनाही बंदुकीचे राज्य संपवायचे आहे. ज्यादिवशी आम्हाला वाटेल की यात पडद्यामागे वेगळं घडतंय, तेव्हा आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा फोडू”, असेही संजय राऊतांनी म्हणाले.