बाहुबली शाळेचे मार्शल आर्ट क्रीडास्पर्धेमध्ये यश...!
schedule21 Nov 24 person by visibility 121 categoryEducation

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
सातारा येथे १९ नोव्हें.२०२४ रोजी संपन्न झालेल्या शासकीय मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेमध्ये 'थांगता' खेळप्रकारात ५२ किलो वजनी गटामध्ये स्वयंम एम.जी.शहा विद्यामंदिर व जुनियर कॉलेज, बाहुबली शाळेचा सागर नवले इ.१० वी याचा व्दितीय क्रमांक आला.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश आवाडे, महामंञी डी.सी.पाटील, कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, संचालक व शाळेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे,उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक डॉ. नेमिनाथ बाळीकाई , अरुण चौगुले,रविंद्र देसाई यांचे प्रोत्साहन लाभले तर क्रीडाअध्यापक शरद जुगळे , पवन नेजकर,उदय पाटील व पालक सागर नवले व रोहीत काशीद यांचे मार्गदर्शन लागले.